मूकनायक

Original price was: ₹200.Current price is: ₹180.

आंबेडकरांचं पत्रकारी लेखन काव्यात्म आहे. त्यात बरीच वितंड आणि विरोधकांना विचारपूर्वक तोडीसतोड दिलेली प्रत्युत्तरंही आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणं यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणं आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेले आहे. आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून आपल्याला पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विक दृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणावर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्याच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली असत.” डॉ. सुरज येंगडे

“परळमधील हरारवाला बिल्डिंग या चाळीतील १४ नंबरच्या खोलीत नोंदणीकृत कार्यालय थाटून ‘मूकनायक’ हा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. जुलै १९२०मध्ये आंबेडकर लंडनला परत जाईपर्यंत या पत्रिकेचे बारा अंक प्रकाशित झाले. टॅब्लॉइड आकारात छापलेल्या जाणाऱ्या या पत्रिकेची सर्वसाधारणपणे आठ पानं असत आणि दोन रकान्यांमध्ये मजकूर काटकसरीपणे बसवला जात असे. प्रत्येक अंकात आंबेडकरांचे सुमारे चार हजार शब्दांचेच संपादकीय लेख असत आणि बहुतांश जागा त्या लेखकांनी व्यापलेली असायची. एका पान पत्रासाठी व बातम्यांसाठी राखून ठेवलेलं होतं; यात इतर नियतकालिकांमधील वर्णनांचाही समावेश होता. दहावा व बारावा असे अंक पूर्णपणे दोन दलितवर्गीय परिषदांना वाहिलेले होते. वार्षिक वर्गणी अडीच रुपये – म्हणजे मुंबईतल्या त्या वेळच्या सुतगिरणीतल्या कामगाराच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या १० टक्क्यांहून कमी होती.” अशोक गोपाळ

Availability: 956 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूकनायक”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart