यश तुमच्या हातात

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

आपण मनाशी ठरवलेली गोष्ट पूर्ण करणे म्हणजे यश. सतत यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचा आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला जाणवेल की, ते परिस्थितीनुरूप आपल्या धारणा जुळवून घेतात. एखाद्या परीक्षेत प्रावीण्य मिळवणे ही चांगली बाब आहे; परंतु तसे झाले तरच आपण यशस्वी होतो असे नाही.

बालपणापासून आजाराने ग्रासलेले स्टीफन हॉकिंग, प्राथमिक शिक्षण पूर्ण न करू शकलेले थॉमस एडिसन आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले, कारण त्यांच्या अंगी ती योग्यता होती. पात्रतेपेक्षा योग्यता अधिक महत्त्वाची आहे. समान पात्रता असतानाही अधिक योग्यता असणारा मनुष्य निवडला जातो. सर्वसामान्य माणूस अपयशी का होतो? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भीती..! भीती मनुष्याचे यशस्वी होण्याचे पंखच छाटून टाकते. अस्थिरता किंवा विचलन हेही एक महत्त्वाचे कारण आहे. ध्येय पक्के असणारा मनुष्य कशानेही विचलित होत नाही. आणखी दोन गोष्टी आहेत, ज्या यशस्वी मनुष्याचं वलय समाजमनात निर्माण करतात.

‘सकारात्मकता आणि सद्‌गुण’ छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांनी जगभरातील लोकांची अंतःकरणं जिंकून घेतली ती सकारात्मकता आणि सद्गुणांच्या बळावर, कारण चारित्र्यवान माणसाचं यश हे अजरामर होऊन जातं. यशाचे घटक काय आहेत? पूर्वीच्या लोकांनी ते कसं मिळवलं ? कोणत्या पद्धतीनं ते दीर्घकाळ टिकतं? हे समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच….

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यश तुमच्या हातात”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

Shopping Cart