गेल ऑम्वेट – पाच बेस्ट सेलर पुस्तकांचा संच
₹1,650 Original price was: ₹1,650.₹1,299Current price is: ₹1,299.
-
Price :
₹1,650Original price was: ₹1,650.₹1,299Current price is: ₹1,299.
1)भारतातील बौद्ध धम्म
प्रस्तुत पुस्तकात भारतातील बौद्ध धम्म, ब्राह्मणी धर्म आणि जात यांच्या २,५०० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा विशेष अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्माचे आकलन या प्रयत्नाचा आरंभबिंदू आहे, बौद्ध धम्माचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक पैलू पुढे आणण्यासाठी गेल ऑम्व्हेट यांनी बौद्ध साहित्याचे मूळ स्रोत आणि उपलब्ध नवीन साहित्य या दोन्हींचे केलेले संशोधन आहे.
2)जात समजून घेतांना
भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात’ अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा (पारंपरिक) भारतीय समाज आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनाला पर्याय देणाऱ्या, दलित चळवळीतून तयार झालेल्या पर्यायी वैचारिक मांडणीचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
3)आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या छोट्याशा चरित्रामध्ये प्रसिद्ध विचारवंत गेल ऑम्वेट यांनी आंबेडकरांच्या प्रेरणादायी जीवनाची कहाणी सांगितली आहे.
4)”बेगमपुरा”च्या शोधात
मुक्त झालेला मी चांभार’ असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२०) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या ‘बेगमपुरा’ या गीतातून मांडले. बेगमपुरा एक आधुनिक जातिविहीन, वर्गविहीन, करमुक्त आणि दुःखमुक्त शहर ! ब्राह्मणी कलियुगाच्या दुःस्वप्नाच्या (डिस्टोपिया) थेट विपरीत असा हा कल्पितादर्श.
5)ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं
गेल ऑम्वेट स्वतंत्र भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कृतिशील विचारवंत. स्वतंत्र भारतातील स्त्रियांच्या चळवळी, दलित आणि कष्टकरी चळवळींमधील त्यांचा सहभाग आणि त्यांची सैद्धांतिक मांडणी वैचारिक क्षितीज भेदणारी ठरली. त्यांच्या भारतातील विलक्षण राजकीय प्रवासाची सुरुवात झाली ती १९७५ साली झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या संयुक्त स्त्री मुक्ती परिषदेपासून…ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज!









Reviews
There are no reviews yet.