डॉ. जेसन फंग यांची दोन प्रसिद्ध पुस्तकं
₹800 Original price was: ₹800.₹699Current price is: ₹699.
-
Price :
₹800Original price was: ₹800.₹699Current price is: ₹699.
1.द डायबिटीज कोड
टाईप टू डायबिटीजचा नैसर्गिकरीत्या प्रतिबंध आणि उपचार
पाने: 328। किंमत: ₹400
बहुसंख्य डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि अगदी डायबिटीजचे तज्ज्ञदेखील टाइप टू डायबिटीजला एक वर्षानुवर्षे रेंगाळणारा आणि उत्तरोत्तर वाढतच जाणारा आजार मानतात. परंतु या धारणेत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या पुस्तकाद्वारे डॉ. फंग यांनी सप्रमाण पटवून दिलेले सत्य हे आहे की टाइप टू डायबिटीजला पूर्णतः परतवता येऊ शकते. स्पष्ट आणि प्रेरक भाषेत समजावून देत डॉ. फंग स्पष्ट करतात की, इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणाऱ्या इतर औषधांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक उपचारांमुळे डायबिटीजची समस्या कमी होण्याऐवजी अधिक बिकट होऊ शकते, वजनात लक्षणीय वाढ होऊ लागते आणि पुढे जाऊन हृद् रोग देखील होतो. टाइप टू डायबिटीजवर प्रभावीपणे उपचार करण्याचा एकमेव मार्ग हा औषधोपचारांचा नसून योग्य आहार आणि अधूनमधून उपवास करणे हा आहे.
2. द ओबेसिटी कोड
वजन कमी करणाऱ्या रहस्यांचा उलगडा
पाने: 328। किंमत: ₹400
या अत्यंत वाचनीय आणि प्रेरक पुस्तकात डॉ. जेसन फंग लठ्ठपणाचा मूलगामी व सबल सिद्धान्त मांडतात. हा सिद्धान्त योग्य पोषण आहाराबद्दल धक्कादायक अंतर्दृष्टी प्रदान करतो. याबाबतच्या पाच मूलभूत पायऱ्यांसह आयुष्यभरच्या सवयींचे सूत्र यांच्या साहाय्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळीही नियंत्रित होईल. उत्तम आरोग्यासाठी, निरोगी वजन प्राप्त करण्यासाठी, आंतरखंडित उपवासाचा (इंटरमिटंट फास्टिंग) उपयोग करून इन्सुलिन रेझिस्टन्सचे चक्र कसे मोडायचे याची उकलदेखील डॉ. फंग करतात




Reviews
There are no reviews yet.