कम्युनिस्ट विचारांवरील तीन पुस्तकांचा संच
₹950 Original price was: ₹950.₹760Current price is: ₹760.
-
Price :
₹950Original price was: ₹950.₹760Current price is: ₹760.
1. द मोटारसायकल डायरीज – अर्नेस्टो चे गव्हेरा
पाने:256। किंमत: ₹ 300
शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अर्नेस्टो चे गव्डेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा ‘द मोटरसारकल डायरीज या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद,
2.चे गव्हेरा, एका क्रांतिकारकाने दुसऱ्या क्रांतिकारकाचे लिहिलेले उत्कृष्ट चरित्र – फिडेल कॅस्ट्रो
पाने:252। किंमत: ₹ 300
क्युबाचाआणि लॅटिन अमेरिकेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो आणि आणि चेमधील ऐतिहासिक क्रांतिकारी भागीदारीबद्दल फिडेल यांनी अतिशय उत्कटतेने केलेले लिखाण. यातून फिडेलने चे गव्हेराचे एक ‘माणूस’, एक ‘क्रांतिकारक’ आणि एक ‘बुद्धिजीवी’ या नात्यांनी विश्लेषण केले असून, त्यातून चे गव्हेराचे ज्वलंत चित्र तयार झाले आहे!
3. कार्ल मार्क्स – राहुल सांकृत्यायन
पाने:349। किंमत: ₹ 350
कार्ल मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवा महंमद पैगंबर यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्या मानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि आशा-आकांक्षांवर या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं ! त्याच्या विचारांची झिंग आणि प्रेरणा घेऊन लढणारे आणि प्राण देणारे कोट्यवधी जसे उभे राहिले, तसेच तितकेच लोक त्याचा संपूर्ण तिरस्कार आणि धिक्कार करत त्याच्या विचारांचा नायनाट करण्यासाठी त्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले …आणि हे चक्क गेली दीडशे वर्षं चाललं ! अजूनही संपूर्ण कम्युनिझमचा पाडाव केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्र करीत असली, तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठे करावाच लागतो.






Reviews
There are no reviews yet.