भारतीय आदिवासी क्रांतिकारकांविषयी माहिती
₹800 Original price was: ₹800.₹720Current price is: ₹720.
-
Price :
₹800Original price was: ₹800.₹720Current price is: ₹720.
1.भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक – तुहिन ए. सिन्हा
पाने: 183। किंमत: ₹250
१८५७च्या बंडापूर्वी ७५ वर्षे, आदिवासींनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. त्या वेळी आदिवासी धनुष्यबाण, भाले ही त्यांची पारंपरिक शस्त्रे वापरून लढले होते. एकोणिसाव्या शतकात ज्या राजकीय चळवळींचा इतिहास आपण वाचतो, त्यांची सुरुवात या आदिवासी बंडखोरांनी त्यापूर्वीच केली होती. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्याला दुर्गम भागात, जंगलात आदिवासींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते. इतिहासाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या मुख्य प्रवाहाला समांतर असे हे लढे आदिवासी लढत होते, याचीही दखल घ्यायला हवी. ‘भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक’ हे पुस्तक म्हणजे ब्रिटिश आक्रमणाला आव्हान देणाऱ्या अनाम नायकांच्या शौर्याला मानवंदना देण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे
2.बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार -महाश्वेता देवी
पाने:270। किंमत: ₹ 300
हा काळ अतिशय स्फोटक, अस्थिर आणि व्यस्त. काळाच्या हाती बाण, हृदयात ज्वाळा, डोळ्यांपुढे एकमेव लक्ष्य ! बिरसाला समजत होतं, सुगाना आणि कर्मी हे निमित्तमात्र होते. त्याची निर्मिती केली होती काळाने. मुंडांच्या जीवनात वर्षांनुवर्षे होळीची आग जळत होती. पण उलगुलानची आग बिरसाशिवाय कोणालाही लावता आली नव्हती. आता वन्ही उत्सव व्हायची गरज होती, म्हणूनच काळाने बिरसाची योजना केली होती.
3.राष्ट्र निर्माणात आदिवासी -डॉ जितेन्द्र मीणा
पाने: 170। किंमत: ₹250
हे पुस्तक वाचताना लक्षात येते की आदिवासींना दुहेरी लढा द्यावा लागला – पहिला, ब्रिटिशांविरुद्ध आणि दुसरा, स्थानिक उच्चभ्रूंच्या लूटमारीविरुद्ध. हे पुस्तक इतिहासाला आदिवासी दृष्टिकोनातून पाहण्याची, समजून घेण्याची संधी देते – असा दृष्टिकोन ज्याचे बहुधा दमन करण्यात आले आहे. ‘राष्ट्र निर्माणात आदिवासी’ हे पुस्तक इतिहासाच्या मौनाचा प्रभावी प्रतिध्वनी आहे आणि ज्या प्रश्नांपासून इतिहास दीर्घकाळ लपत राहिला त्या प्रश्नांची दखलसुद्धा आहे.






Reviews
There are no reviews yet.