क्रांतिकारकांनी स्वतः लिहिलेल्या दोन डायऱ्या

Original price was: ₹650.Current price is: ₹600.

1.शहीद भगतसिंह यांची जेल डायरी – अभिजीत भालेराव
पाने:302। किंमत: ₹350
या डायरीमध्ये भगतसिंग विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात . मानवाच्या उत्पत्तीपासून कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत सामंतशाही च्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत धर्माच्या विवेचना पासून ते नास्तिकतेच्या तर्कापर्यंत, गुलामगिरीपासून क्रांती आणि आराजकतेच्या भीतीपर्यंत , कायद्याच्या अभ्यासापासून ते मृत्युदंडाच्या शिक्षेपर्यंत आणि फ्रेंच राज्यक्रांती पासून रशियन राज्यक्रांती पर्यंत प्लेटो – साँक्रेटिसच्या तत्त्वज्ञानापासून बर्ट्रान्ड रसेलच्या चिकित्सेपर्यंत ते सर्व मुद्द्यांचा अभ्यास करताना दिसतात समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था ,बाल कामगारांची समस्या तुरुंगातील एकाकीपणा मातृभूमीसाठी केलेल्या बलिदान चे महात्म्य या सर्व विषयांवरती त्यांनी या डायरीमध्ये भरभरून लिहिलेला आहे. ही डायरी वाचत असताना आपल्या मेंदूच्या वैचारिक प्रगल्भतेचा आवाका नक्कीच वाढलेला असेल ,आणि आपला मेंदू परिपूर्ण वैचारिकतेच्या प्रवासावरती नक्कीच पुढे गेलेले असेल .

2.द मोटारसायकल डायरीज – अर्नेस्टो चे गव्हेरा
पाने:256। किंमत: ₹300
अर्नेस्टो ‘चे’ गव्हेरा, हा एल चे किंवा फक्त चे म्हणून ओळखला जाणारा, एक मार्क्सवादी क्रांतिकारक, चिकित्सक, लेखक, स्वप्निल विचारवंत, गनिमी नेता, मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात. या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोनं अमेरिका खंडाच्या प्रवासात घेतलेले फोटो आणि नकाशे, अलैदा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना, सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन कवी सिंटिओ व्हिटियर यानं केलेलं या पुस्तकाचं रसग्रहण आणि ‘चे’नं त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रांतिकारकांनी स्वतः लिहिलेल्या दोन डायऱ्या”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart