टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस ऑफ द फायनॅन्शियल मार्केट्स

Original price was: ₹600.Current price is: ₹540.

१९८०च्या दशकात जॉन जे. मर्फी यांनी लिहिलेल्या टेक्निकल अॅनॅलिसिस ऑफ द फ्यूचर्स मार्केट्सचा सर्वत्र मोठा गाजावाजा झाला. तांत्रिक विश्लेषणाच्या संकल्पना आणि फ्यूचर्स मार्केटमध्ये केलेली त्यांची अंमलबजावणी यांचे ते एक सर्वंकष, तरी वापरायला सोपे असे मार्गदर्शक पुस्तक होते. लवकरच ते एक ‘क्लासिक’ म्हणून गणले गेले. फेडरल रिझर्व्हच्या संशोधनात्मक अभ्यासांत त्याचा समावेश झाला आणि मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनच्या चाचणी कार्यक्रमात प्राथमिक स्रोत म्हणून त्याचा उपयोग सुरू करण्यात आला. आज या क्षेत्रातले ‘बायबल’ अशीच त्या पुस्तकाची गणना होते. भरपूर मागणी असल्यामुळे जॉन मर्फी यांनी हे पूर्ण पुस्तक आता नव्याने लिहिले आहे, त्याची व्याप्ती वाढवली आहे आणि सर्व वित्तीय बाजारांची माहिती त्यात समाविष्ट केलेली आहे.
ज्यांमुळे आधीचे पुस्तक कमालीचे लोकप्रिय झाले, ती स्पष्टता, सोपेपणा आणि तार्किक रचना याही पुस्तकात आहेच; पण आलेखांमधील नवी तंत्रे आणि या बदलत्या काळातल्या-क्षेत्रातल्या नवीन घटना यांचाही वेध टेक्निकल अॅनॅलिसिस ऑफ द फायनॅन्शियल मार्केट्समध्ये घेतलेला आहे. यात प्रत्येक प्रकरण नव्याने लिहिलेले आहे. स्टॉक मार्केटवर मोठा भर दिलेला आहे आणि यात शेकडो नवीन छायाचित्रे आणि आकृत्याही दिलेल्या आहेत.

1 review for टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस ऑफ द फायनॅन्शियल मार्केट्स

  1. Rated 5 out of 5

    Shugat Manwar (verified owner) –

    खूप छान लिहिले आहे

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart