तुमच्या पैशाचं गणित

Original price was: ₹300.Current price is: ₹270.

हे पुस्तक नाही. हा संवादाला तोंड फोडणारा बॉम्ब आहे. हा बॉम्ब पेटवा, तो कॉफी टेबलवर भिरकवा आणि संवादाला कसं तोंड फुटतं, ते पहा. कारण पैसा म्हणजे गणित नव्हे, पैसा म्हणजे भावना. पैशाचं अंदाजपत्रक तयार करणं म्हणजे शिक्षा नव्हे, ती असते जाणीव. ‘अधिक मिळाल्याने अधिक सुरक्षित वाटेल,’ असा तुमचा समज असेल, तर ते तसं नसतं. १०१ सोप्या रेखाटनांच्या आणि लघुनिबंधांच्या माध्यमातून कार्ल रिचर्डस तुमचं पैशांशी असलेलं नातं नव्याने पडताळून पाहण्यासाठी आमंत्रित करत आहेत, ते दुरुस्त करण्यासाठी नाही, तर फक्त स्पष्टपणे पाहण्यासाठी ! हे पुस्तक म्हणजे आर्थिक आकर्षण नाही; यात शेअर बाजाराची भविष्यवाणी नाही; झटपट व्यवहार नाहीत; आकडेमोड नाही. असं समजा, की तुम्ही एखाद्या सुज्ञ मित्राशी संवाद साधता आहात, जो सौम्य, पण ठाम शब्दांत तुम्हाला खालील गोष्टींवर विचार करायला भाग पाडत आहे न आवडणाऱ्या व्यक्तींशी आपण स्वतःची तुलना का करतो? “मला अजून हवंय” असं म्हणता, तेव्हा तुम्ही नेमकं काय विकत घेण्याच्या प्रयत्नात असता ? ‘ पैसा’ नाही, तर तुम्ही ‘त्या पैशाला दिलेलं काम’ ही तुमची खरी समस्या असेल तर? हे पुस्तक तुम्हाला पैशाकडे आणि स्वतःकडेसुद्धा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला प्रवृत्त करेल.तुम्ही पैसा चांगल्या पद्धतीने हाताळावा, यासाठी हे पुस्तक नाहीये. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहावं यासाठी हे पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमच्या पैशाचं गणित”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart