द गॉड डिल्यूजन

Original price was: ₹500.Current price is: ₹450.

या पुस्तकात विख्यात शास्त्रज्ञ व निरीश्वरवादी रिचर्ड डॉकिन्स हे देव, धर्म आणि त्यातून तयार होणारे अविवेकी जगणे यांची धारदार चिकित्सा अत्यंत तीक्ष्ण शब्दांत करतात. धार्मिक धारणांचा तार्किक खुळचटपणा नि त्यांना बळी पडल्यामुळे मानवात रुजणारी मानसिक, भावनिक, वैचारिक आणि बौद्धिक गुलामी यांच्यावर डॉकिन्स कडाडून हल्ला चढवतात.
देव आणि धर्म यांना सर्वंकष नकार देऊन विवेकी नास्तिक्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांचा स्वीकार करायला हवा, असे ते आग्रही प्रतिपादन करतात. श्रद्धा ही बाब केवळ अविवेकी नसून ती अत्यंत घातक असते, हे कौशल्यपूर्ण युक्तिवादाने ते पटवून देतात.
एकंदर, आधुनिक जगात धर्माविषयी कसा विचार करावा, याचा दाखला देणारे हे पुस्तक देव नि दैवविषयक सर्व प्रकारच्या धारणांची तर्ककठोर चिकित्सा करते, आणि अत्यंत कौशल्यपूर्ण युक्तिवाद करत देव ही बाब निव्वळ भ्रम असल्याचेही सप्रमाण प्रतिपादन करते. सजगतेने व सुबुद्धपणे जगण्यासाठी विज्ञान, विवेक आणि तर्क यांची नितांत आवश्यकता असल्यामुळे नास्तिक, आस्तिक किंवा अज्ञेयवादी अशा सर्वांनीच हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द गॉड डिल्यूजन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

Shopping Cart