झरोका

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

सहसा, हौशी किंवा नवोदित मराठी लेखिकांच्या कथा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबजीवनाभोवती घोटाळणाऱ्या असतात. जुलेखा शुक्ल ह्यांच्या कथांमधलं विश्व ह्याहून फार व्यापक आहे. त्यांना देशपरदेशाची वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी आहे. लग्न, बाईपुरुष नातं, फाळणीमुळे विस्थापित झालेल्याचं जग, प्रवासातले अनुभव, मनस्वी व्यक्तीचं जगणं, परदेशाच्या मोहापायी लग्नाळू मुलींची होणारी फसवणूक, प्रौढ पतीचं तरुण पत्नीशी संवेदनाशून्य वागणं अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा त्यांनी सहज लिहिल्या आहेत. तसंच त्यांनी अगदी आताच्या अद्ययावत विषयांनाही हाताळलं आहे. करोना काळामध्ये मोबाईलवर शाळा शिकायला बघणाऱ्यांची योग्य त्या मोबाईलच्या अभावामुळे होणारी कुचंबणा ह्यात आहे. तसंच एखाद्याशी प्रत्यक्ष लग्न न करताही समाधानी जीवन त्याच्यासोबत जगणारी लिंडा ह्यात आहे. आपल्याकडे घरकाम करणार्या क्षुल्लक बाईची सुखसमृध्दीची छोटी छोटी स्वप्नं मुद्दाम साकारणारी मोठ्या मनाची उदार मालकीण आहे. निबर नवरा कितीही संवेदनाशून्य पध्दतीने वागवत राहिला तरी चेहर्यावरचं हसू टिकवून ठेवणारी उमदी सहप्रवासिनी आहे. हे सर्व घटनाप्रसंग किंवा ह्यातल्या नाट्याची बीजं ही एकमेकांपासून चांगलीच वेगळी आहेत. तरी ती अचूक टिपण्याची आणि त्यांच्यातलं नाटय फुलवण्याची क्षमता लेखिकेमध्ये आहे. शेवटी कथा फुलते ती मुख्यतः तिच्यातल्या नाट्यामुळे. हा नाट्यांश अंगभूत असला की कथेचा विस्तार करणं सोपं जातं. ‘झरोका’ लिहितांना लेखिकेला ह्यासाठी अडून राहावं लागत नाही.

– जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या प्रस्तावनेतून

Availability: 1000 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झरोका”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart