अशोक कुमार पांडेय यांची चार प्रसिद्ध पुस्तकं

Original price was: ₹1,600.Current price is: ₹1,280.

1.काश्मिरनामा , इतिहास आणि वर्तमान -अशोक कुमार पांडेय
पाने:565। किंमत: ₹500
अशोक कुमार पांडेय यांचे ‘काश्मीरनामा’ हे पुस्तक बाचून एक सुखद अनुभव येतो. यातील एक एक ऐतिहासिक घटना काट्याकाळजीने, कोणतीही छेडछाड न करता, कोणत्याही पूर्वग्रहापासून मुक्त होऊन लिहिली गेली आहे. मला आशा आहे की, ‘काश्मीरनामा’ या पुस्तकाकडे काश्मीरमध्ये रुची असलेले वाचक, संशोधक आणि शिक्षक हे इतिहासाच्या पुस्तकातील एक दिशादर्शक पुस्तक म्हणून पाहतील.

2.काश्मीर आणि काश्मिरी पंडित – अशोक कुमार पांडेय
पाने:440। किंमत: ₹500
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे.

3.त्याने गांधींना का मारलं , षड्यंत्राची आणि स्त्रोतांची पडताळणी -अशोक कुमार पांडेय
पाने: 296। किंमत: ₹300
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य (१) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.

4.सावरकर काळे पाणी आणि त्यानंतर -अशोक कुमार पांडेय
पाने: 247। किंमत: ₹300
हे पुस्तक म्हणजे एका सावरकरांपासून दुसऱ्या सावरकरांपर्यंत झालेल्या प्रवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. यात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अशोक कुमार पांडेय यांची चार प्रसिद्ध पुस्तकं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart