अंकूर वारिकू यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं

Original price was: ₹898.Current price is: ₹760.

1.बिल्ड ॲन एपिक करिअर – अंकूर वारिकू
पाने:235। किंमत: ₹299
अगदी जन्माला आल्यापासून आपल्याला एक गोष्ट करायला सांगितली जाते. आणि तीही लवकरात लवकर, सेटल व्हा! कॉलेज पूर्ण करा. सेटल व्हा. नोकरी शोधा. सेटल व्हा. लग्न करा. सेटल व्हा. मुलं होऊ द्या. सेटल व्हा. घर खरेदी करा. सेटल व्हा. पण, मला माहिती आहे की तुम्ही सेटल व्हायला घाबरता. तुम्हाला ते नकोय म्हणून नाही तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी सेटल होणार आहात ती योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्हाला भीती वाटते. मी हे पुस्तक तुम्हाला मदत करण्यासाठी लिहिलं आहे. तुम्हाला सेटल होण्यास मदत करण्यासाठी नाही. तुम्हाला शोध घेण्यास मदत करण्यासाठी. तुमच्या करिअरसाठी योग्य मानसिकता घडवण्यासाठी. तुम्हाला एक असामान्य करिअर घडवण्यास मदत करण्यासाठी.

2.मेक एपिक मनी प्रचंड पैशाचे अखंड मार्ग – अंकूर वारिकू
पाने:342। किंमत: ₹299
फॉर्च्यून मॅग्झीनच्या, भारतासाठी तयार करण्यात आलेल्या ४० अंडर ४० लिस्टमध्ये आणि फोर्ज टॉप १०० डिजीटल क्रिएटर्स लिस्टमध्येही बेस्ट सेलिंग कंन्टेन्ट क्रिएटर म्हणून समाविष्ट झालेल्या अंकुश वारिकू यांचे तिसरे पुस्तक.‘शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशाविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत ? पैशाविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं ? या सगळ्या गोष्टी बदलल्याच पाहिजेत. ‘मेक एपिक मनी’ या माझ्या पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. मी स्वतः ज्या गोष्टी खूप उशिरा अतिशय मुश्किलीनं शिकलो, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून लाखो-कोट्यवधी वाचकांना शिकवण्याची माझी इच्छा आहे.’– अंकुर वारिकू

3.अभ्यासक्रमाच्या पलीकडे – अंकुर वारिकू
पाने:232। किंमत: ₹299
शाळेत तुम्हाला सूत्र शिकवली जातात, हे पुस्तक तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं.
दिशा सापडत नसेल, उदास वाटत असेल, सगळे पैसे संपले असतील किंवा गोंधळ उडाला असेल किंवा सततच्या ‘है कर, ते नको’च्या सूचनांचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय कराल? कोणतंही पान उघडा. या पुस्तकात प्रकरणं नाहीत, नियम नाहीत, फक्त संवाद आहे. खराखुरा,
कमी शब्दांचा, थेट,
स्पष्ट आणि उपयुक्तसुद्धा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंकूर वारिकू यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart