तुमचं आयुष्य बदलणाऱ्या 21 संकल्पना

Original price was: ₹200.Current price is: ₹180.

मोठं होत असताना महत्त्वाकांक्षा, यश, ध्येय यांच्याबद्दल आपल्याला शिकवलं जातं. पण आयुष्य आपल्याला नेमकं कसं वाटायला हवं आहे, आणि कोणत्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्यावर आपल्याला ते ‘अनुभवता येईल, याबद्दल कधीच शिकवलं जात नाही. संकल्पना म्हणजे काय? ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा ऐकता आणि त्यानंतर तुम्हाला वाटते, ‘मी हे असं करायला हवं.’ खरं तर रोजचे जगण्याचे संघर्षही तेच आणि तसेच असतात, त्यांत काही वेगळेपण नसतं. कामात अर्थाचा शोध घेणं असो, नातं सुदृढ करणं असो, आर्थिक ताणाचं किंवा भावनांचं व्यवस्थापन करणं असो, ही सर्व आव्हानं जुनीच आहेत. तरीही, काही कारणास्तव आपल्याला असं वाटतं, की जणू त्यांचा सामना करणारे आपणच पहिले आहोत. आपल्या आधी अनेक विचारवंतांनी या समस्यांवर विचार करून त्यांचे मौलिक विचार मांडलेले असतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्षच करतो.
या पुस्तकात महान विचारवंतांच्या 21 संकल्पना आधुनिक
जगाला अनुसरून मांडलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात
आपण त्या लागू करू शकतो. प्रचंड कल्लोळ अनुभवणाऱ्या आणि सैरभैर झालेल्या मनांचा सध्याचा काळ आहे. जे खरोखर महत्त्वाचं आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणं त्यामुळेच अतिशय महत्त्वाचं झालं आहे. या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही वरवरच्या गोष्टींमधून जे महत्त्वाचं आहे, तेवढंच वेचू शकाल आणि आयुष्य हेतूपूर्वक जगायला लागाल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमचं आयुष्य बदलणाऱ्या 21 संकल्पना”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart