आंबेडकर
₹400 Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360.
- Book : आंबेडकर
- Authors :नलिनी पंडित
- Pages: 328
-
Price :
₹400Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360. - ISBN: 9789347457685
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांनी आपले व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांच्याद्वारे भारताच्या समाजजीवनावर आपला ठसा उमटविला त्यांच्यामध्ये लो. टिळक, महात्मा गांधी यांच्याबरोबर डॉ. आंबेडकरांचीही गणना करावी लागेल. आंबेडकरांच्या मते, ‘कोणीही मनुष्य महापुरुष गणला जाण्यास त्याच्या अंगी बुद्धिमत्ता व कार्यनिष्ठा असावी लागते हे तर खरेच, पण महापुरुष होण्यास हे गुण आवश्यक असले तरी पुरेसे नाहीत. समाजपरिवर्तनाच्या हेतूने जो मनुष्य प्रेरित झालेला असेल आणि त्या दृष्टीने समाजातील अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे काम ज्याने हाती घेतले असेल तोच खरा महापुरुष होय.’ आंबेडकरांनी केलेली महापुरुषाची ही व्याख्या त्यांच्या स्वतःच्या जीवनालाही तंतोतंत लागू पडते. आंबेडकरांच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विचारांचा परामर्श घेण्याचा वेधक प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.




Reviews
There are no reviews yet.