स्वतः वैज्ञानिकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच
₹3,190 Original price was: ₹3,190.₹2,390Current price is: ₹2,390.
-
Price :
₹3,190Original price was: ₹3,190.₹2,390Current price is: ₹2,390.
स्वतः वैज्ञानिकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच
वाचली तर विज्ञान सोपं वाटल्याशिवाय राहणार नाही.
१) काळाचा संक्षिप्त इतिहास – डॉ. स्टीफन हॉकिंग
महास्फोटापासून कृष्णविवरांपर्यंत आणि अशा अनेक मन भारून टाकणाऱ्या रहस्यांचा शोध सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत या शतकातील सर्वांत विलक्षण बुद्धिमान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी या पुस्तकात घेतला आहे.
पाने: २४० । किंमत: ₹३००
२) जीन मशीन – वेंकी रामकृष्णन
भारतीय वंशाचे नोबेल विजेते वेंकी रामकृष्णन जीन आणि रायबोसोम यांविषयी सांगताना त्यांच्या प्रयोगशाळेपासून नोबेल पुरस्कारापर्यंतच्या प्रवासाची थरारक कहाणी उलगडतात.
पाने: ३५२ । किंमत: ₹३००
३) शुअरली यू आर जोकिंग, मि. फाईनमन – रिचर्ड फाईनमन
नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांच्या भन्नाट अनुभवांनी भरलेले हे पुस्तक विज्ञान अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगते.
पाने: ३८४ । किंमत: ₹४००
४) ॲस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी – नील डीग्रास टायसन
विश्व, तारे, आकाशगंगा आणि आपल्या अस्तित्वाविषयीचे गुंतागुंतीचे प्रश्न अत्यंत थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे लोकप्रिय पुस्तक.
पाने: १९१ । किंमत: ₹३००
५) कॉसमॉस – कार्ल सेगन
विश्वाची उत्क्रांती, जीवनाची उत्पत्ती तसेच विज्ञान आणि सभ्यता एकमेकांसोबत कशा विकसित झाल्या याची विलक्षण कथा खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी रंजक पद्धतीने समजावून सांगितली आहे.
पाने: ३५४ । किंमत: ₹४५०
६) मिथकांपासून विज्ञानापर्यंत – गौहर रझा
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आणि कवीमनाचे गौहर रझा ब्रह्मांड आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना ‘विज्ञान’ म्हणजे नेमकं काय याची उकल करण्याचा प्रयत्न करतात. धर्म आणि विज्ञान यांच्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देते.
पाने: २२४ । किंमत: ₹३००
७) जादुई वास्तव – रिचर्ड डॉकिन्स
जगातील विविध मिथकांमधून विश्वाची आणि निसर्गाची उकल करण्याचा प्रयत्न मानवाने नेहमीच केला आहे. पण खऱ्या अर्थाने या सगळ्यामागची “जादू” काय आहे? उत्क्रांतीवाद, नैसर्गिक निवड आणि तर्काधारित विचारसरणीच्या आधारे या प्रश्नांची वैज्ञानिक उकल येथे केली आहे.
पाने: २०७ । किंमत: ₹२५०
८) द गॉड डिल्यूजन – रिचर्ड डॉकिन्स
धर्म, श्रद्धा आणि तर्क यांच्या नात्याचा वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनातून घेतलेला विचारप्रवर्तक वेध.
पाने: ४४८ । किंमत: ₹५००
९) अग्निपंख – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
पाने: १६८ । किंमत: ₹२४०
१०) माझे जीवन – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
पाने: १४३ । किंमत: ₹१५०
शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञानाला केवळ प्रयोगशाळेत मर्यादित ठेवले नाही, तर ते राष्ट्रनिर्मितीशी जोडले.
या पुस्तकांतून कलामांचा व्यक्तिगत जीवनप्रवास, धैर्य आणि दृढ विश्वासाची प्रेरणादायी कथा तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी स्वतंत्र भारताने केलेल्या संघर्षाची गाथा समजते.
संचाची एकूण किंमत-
₹३,१९० + कुरियर चार्जेस १००
📚 विशेष सवलत-
₹२,३९० मध्ये कोणत्याही कुरियर चार्जेसविना घरपोच मिळेल. 🚚
🚚 कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध.










Gopal chaudhari –
Good