महात्मा जोतीराव फुले निवडक वाङ्मय
₹400 Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360.
- Pages: 415
-
Price :
₹400Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360. - ISBN: 978-81-19812-84-4
महात्मा जोतीराव फुले (१८२७-१८९०) हे एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाचे समाजसुधारक असून त्यांनी स्त्री शिक्षण, दलितांचं शिक्षण, अस्पृश्योद्धार, विधवा पुनर्विवाह यांसह इतर अनेक क्रांतिकारक समाजसुधारणा केल्या. त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. त्या मार्फत तत्कालीन समाजात समतेची स्थापना करण्यासाठी विपुल परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजातून अनेक सत्यशोधक तयार झाले. त्यांच्या विचार-प्रेरणेतून स्त्रीवादी विचारांच्या कणखर पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे घडल्या. महात्मा फुले यांनी समाजसुधारणांसह बहुजनांचं प्रबोधन व उन्नती व्हावी यासाठी विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यापैकी निवडक वाङ्मयाचा हा संग्रह. त्यांचं लेखन तत्कालीन कर्मठ रूढी-परंपरा नि समाज यांची तर्कनिष्ठुर व कठोर भाषेत चिकित्सक तपासणी करणारं असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा आग्रह धरणारं आहे. हे क्रांतिकारी साहित्य आजही कालसुसंगत असून समकालातील सामाजिक-सांस्कृतिक चळवळींच्या विवेकी वाटचालीसाठी नि वाढीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारं आहे.




Reviews
There are no reviews yet.