मायकल सॅंडेल यांची दोन प्रसिद्ध पुस्तकं
₹850 Original price was: ₹850.₹722Current price is: ₹722.
-
Price :
₹850Original price was: ₹850.₹722Current price is: ₹722.
1.न्याय , कोणती गोष्ट करणं योग्य आहे? – मायकल सॅंडेल
पाने:339। किंमत: ₹450
मायकल सँडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणाऱ्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिद्धान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सँडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्त्वज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वतःची मूल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सँडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरणं म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पडायला लागतो.
2.गुणवत्तेची जुलूमशाही , सर्वहिताचं काय झालं?- मायकेल जे सॅंडल
पाने:312। किंमत: ₹400
आजच्या युगात विजेते आणि पराभूत ही विभागणी कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. आधीच सुदैवी असलेल्यांना सोयीचं ठरेल अशा रितीने अडथळ्यांची रचना केली जाते. याचा परिणाम म्हणून संताप व हताशा खदखदायला लागतात. आज दिसणारा लोकानुनयी विरोध व टोकाचं धृवीकरण ही या परिस्थितीची निष्पत्ती आहे. यातून सरकार आणि आपले सहनागरिक या दोघांविषयीही सखोल अविश्वास निर्माण झाल्याचं दिसतं.आपल्या काळातील या उग्र राजकारणावर मात करायची असेल तर, जागतिकीकरण व वाढत्या विषमतेसोबत आलेल्या यशापयशासंदर्भातील आपल्या प्रवृत्तींचा पुनर्विचार करायला हवा, असा युक्तिवाद विख्यात तत्त्वज्ञ मायकल जे. सँडेल करतात. गुणीजनसत्ताक व्यवस्था विजेत्यांमध्ये अहंकार निर्माण करते आणि मागे पडलेल्यांविरोधात कठोर निवाडा केला जातो, असं सँडेल नमूद करतात. यशाविषयी विचार करण्याचा पर्यायी मार्ग त्यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.




Reviews
There are no reviews yet.