मोसाद’ने केलेला कडवा संघर्ष, अत्यंत धाडसी गोपनीय मोहिमा आणि आपल्या शत्रूना कुठल्याही परिस्थितीत पकडून न्याय मिळवण्याच्या ‘मोसाद’च्या निर्धाराचे दर्शन पुस्तकातून घडेल. यात आईकमनच्या जगभर गाजलेल्या चित्तथरारक अपहरण मोहिमेचा समावेश आहे. हिटलरशाहीत ज्यूंचा निघृण नरसंहार करणाऱ्या आईकमनला पकडून मृत्युदंडाद्वारे मिळवलेला न्याय इथपासून अवघ्या जगावर प्रभाव टाकणाऱ्या यशस्वी मोहिमांच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतील. इस्रायलला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवण्यामागे ‘मोसाद’चा असलेला गोपनीय हात, बेभरवशाच्या मध्य-पूर्व आशियातील देशांत राबवलेल्या चित्तथरारक गुप्तहेर मोहिमांविषयीही वाचकांना अधिक जाणून घेता येईल.
मोसाद
₹199.00 Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00.
- Book : मोसाद
- Authors :एन. चोक्कन
- Translator: अभय जोशी
- Pages: 160
-
Price :
₹199.00Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00. - ISBN: 978-81-19812-96-7
जगभरात सतत भूराजकीय घडमोडी घडत असतात. त्यात सर्वच राष्ट्रांचा मुत्सद्देगिरीच्या नाजूक धाग्यांवर कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाच सुरू असतो. मात्र, या जगाचा डोळा चुकवून काम करणारे एक गोपनीय जग अस्तित्वात आहे. हे आहे इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे विलक्षण जग! या पुस्तकात मोसाद गुप्तचर संस्थेचा इतिहास तर समजेलच; त्याचबरोबर ही संस्था आपल्या देशाच्या छत्रछायेखाली गोपनीय पद्धतीने कसे काम करते आणि आपल्या अत्यंत जोखमीच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे या संस्थेने विविध देशांवर प्रभाव कसा टाकला, याची माहितीही मिळेल.
Details
Author Name | |
---|---|
Book | |
Translator | |
Price | 199 |
ISBN | 978-81-19812-96-7 |
Pages | 160 |
Be the first to review “मोसाद” Cancel reply
Related Books
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
Reviews
There are no reviews yet.