नेहरूंचा भारत

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

इतिहास आणि भारताचा सांस्कृतिक भूतकाळ याविषयी नेहरूच्या आकलनावर भर देत हे पुस्तक अशी एक खिडकी उघडतं जिच्यातून आपल्याला सांप्रदायिकतेविषयी नेहरूंची समज काय होती आणि धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांची   बांधिलकी कशी होती ते दिसतं. हे पुस्तक लोकशाही समाजावरील त्यांचा अढळ विश्वास आणि भारतातील लोकशाहीचं पालनपोषण करण्यात त्यांची अमूल्य भूमिका  यावर प्रकाश टाकतं. तसंच स्वतंत्र, समतावादी अर्थव्यवस्था उभारत असतानाच त्याच्या जोडीला विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनयुक्त समाजव्यवस्था उभारण्याच्या नेहरूच्या प्रयत्नांची दखलही घेत. या सर्व प्रयत्नांतूनच विसाव्या शतकातील एका महान व्यक्तिरेखेचे जीवन आणि कार्य यासंबंधी आपल्याला पुष्कळ माहिती मिळते, त्यांच्या निधनानंतर सहा दशके उलटली आहेत, इतका काळ गेल्यावरही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात  ज्या मूल्यांचं प्रतिबिंच उमटलं होतं आणि त्यातील जी तत्त्वं नेहरूंनी स्वीकारली होती ती तत्त्वं आजही तेवढीच कालसुसंगत आहेत का?
हे पुस्तक अतिशय रोखठोक, युक्तिवादपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारं असून ते नवभारताची मूलभूत संकल्पना शोधण्यासाठी, तिचा प्रसार करण्यासाठी आणि तिचं संरक्षण करण्यासाठी ज्या माणसाने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्याबद्दल महत्वाची माहिती देत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नेहरूंचा भारत”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart