परका-आल्बेर काम्यू
₹300.00 Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00.
- Book : परका-आल्बेर काम्यू
- Authors :आल्बेर काम्यू
- Translator: अवधूत डोंगरे
- Pages: 160
-
Price :
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. - ISBN: 978-93-91629-13-7
फ्रेंचांची वसाहत असणारा १९३०-४०च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स. या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या मेर्मोच्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्मोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो. हे सगळं कसं होत जातं? खून का होतो? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्मोच्या तोंडून सांगणारी ‘परका’ ही आल्बेर काम्यू यांची कादंबरी फ्रेंच भाषेत ‘लेत्रांजे’ म्हणून १९४२ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत ‘द आउटसायडर’ म्हणून तिचं भाषांतर झालं. १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्षं झाली असली, तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थांना वाव देणारी ठरावी.
Availability: 21 in stock
Reviews
There are no reviews yet.