पिंपळांवरची भुतं
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Book : पिंपळांवरची भुतं
- Authors :पीपल बाबा
- Translator: रमा हर्डीकर - सखदेव
- Pages: 320
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 9789347457050
लाखो लोकांसाठी ‘पीपल बाबा’ असणाऱ्या स्वामी प्रेम परिवर्तन यांची संस्मरणं म्हणजे ‘पिंपळांवरची भुतं’ हे पुस्तक.
डायऱ्या, नॅपकिन, वर्तमानपत्रांच्या कडा आणि पाठकोरे कागद यांच्यावर विखुरलेल्या पीपल बाबा यांच्या अनेक वर्षांच्या हस्तलिखित नोंदींमधून या पुस्तकाचा जन्म झाला आहे. या गोष्टी तुम्हाला त्यांच्या बालपणीच्या डेहराडूनच्या गल्ल्यांमध्ये आणि पुण्यातल्या हिरव्यागार कॅन्टोन्मेंटमध्ये घेऊन जातील. तिथे त्यांची आजी आणि त्यांच्या प्राथमिक शाळा शिक्षिका या दोन विलक्षण स्त्रियांनी सर्वच जीवसृष्टीविषयी त्यांच्या मनात कुतूहल आणि आदरभाव जागृत केला, आणि म्हणूनच ते ‘पीपल बाबा’ बनू शकले. आजीच्या गोष्टींमधल्या झाडांवरची भुतं म्हणजे खरं तर, श्रद्धेमुळे जंगलं कशी जतन केली जातात याचेच धडे होते; हे भारतातल्या २२० जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना पीपल बाबांच्या लक्षात आलं. तसंच महत्त्वाकांक्षेने नव्हे तर आत्यंतिक श्रद्धेने काळजी घेण्याच्या साध्या पण प्रामाणिक कृतीमुळे, लाखो लोक एका अनामिक आणि कसलीही ठोस रचना नसलेल्या चळवळीत सामील कसे होऊ शकतात, हेही त्यांना या प्रवासातून दिसून आलं. ‘पिंपळांवरची भुतं’ हे प्रामाणिक कथन शांतपणे तुमच्यात बदल घडवून आणतं. पृथ्वीची स्पंदनं आपल्याला आधीपासून ऐकू येत असतात, मातीच्या कहाण्या आपल्याला समजू शकतात, आणि झाडाच्या सावलीत जाणवणारं प्रेम आणि पानांच्या सळसळीतलं काव्यही आपल्याला चिरपरिचित असतं, याची आठवण करून देणारं पुस्तक. आपण फक्त याचं स्मरण ठेवायला हवं…



Reviews
There are no reviews yet.