रेत समाधी
₹499.00 Original price was: ₹499.00.₹399.00Current price is: ₹399.00.
- Book : रेत समाधी
- Authors :गीतांजली श्री
- Translator: सरिता आठवले
- Pages: 414
-
Price :
₹499.00Original price was: ₹499.00.₹399.00Current price is: ₹399.00. - ISBN: 978-81-959784-3-4
कथा कथनाच्या एका वेगळ्याच शैलीची हाताळणी ह्या कादंबरीत बघायला मिळते. कादंबरीचे कथानक, कालावधी, भावभावना, कथन सगळंच आपल्याला माहीत असलेल्या सर्व मर्यादा, सीमांचे उल्लंघन करणाऱ्या काहीशा वेगळ्या ढंगात! नित्य सवयीही विलक्षण आणि नवीन वाटणाऱ्या! हे ओळखीचं जगही जादूने भारलेलं वाटायला लागतं, त्यांच्यातील दरी भरून येते. काळाचे सातत्य प्रकर्षाने पुढ्यात येत राहते. प्रत्येक घटनेचे भूतकाळातील घटनांशी अतूट नातं आणि प्रत्येक क्षण म्हणजे निद्रिस्त युग. उदाहरणच द्यायचं झालं तर वाघा बॉर्डरचे देता येते आणि सामान्य कुटुंबाचेही देता येते – रोज संध्याकाळी होणारं हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या राष्ट्रवादाच आक्रमक प्रदर्शन, • सामूहिक हत्याकांडाच्या आक्रोशाचा गदारोळ एकत्र कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यात डोकावणाऱ्या भूतकाळाच्या सावल्या !
ह्यात सीमारेषा आहेत. त्या सीमारेषांचे उल्लंघन ह्या कथेला उंचावर नेऊन ठेवते. स्त्री-पुरुष, तरुण वयस्क, तन-मन, प्रेम-तिरस्कार, निद्रिस्त जागृत, एकत्र एकल कुटुंब, हिंदुस्तान-पाकिस्तान, मानव इतर जीवसृष्टी, ह्यांच्या स्वरूपात ह्या सीमारेषा आपल्यापुढे येत राहतात. सीमारेषेच्या व्याख्येत इतर जीवसृष्टीचा समावेश केल्यावर ही कथा अनेक वेळा फुलपाखरं, कावळे, चकोर किंवा रस्ता, परंपरागत दरवाजाच्या कथनातून पुढे जाते. ह्यात लेखिकेची हेतूपूर्वक योजकता दिसून येते.
Reviews
There are no reviews yet.