रायन हॉलिडे यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं

Original price was: ₹1,050.Current price is: ₹840.

1. द ऑबस्टॅकल इज द वे
अडथळा हाच यशाचा मार्ग
पाने: 160 । किंमत: ₹250
या जगातील महान यशस्वी लोकांकडे विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं -‘मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो’. हे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉपोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात आणि हेही उलगडतात :

2 .द डेली डॅड
आई – बाबांसाठी पालकत्वाचे कानमंत्र
पाने:424   । किंमत: ₹400
पालक होणं ही आयुष्यभराची अर्थपूर्ण आणि मोठी जबाबदारी असते. अर्थातच ती सोपी अजिबात नसते. पालकत्वाच्या या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतात. कधी यशाची शिखरं खुणावतात, तर कधी अपयशाने निराश व्हायला होतं. कधी राग येतो, चिडचिड होते, तर कधी हृदय प्रेमाने भरून येतं. पण हा प्रवास करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतिहासात या आव्हानांचा सामना अनेकांनी केला आहे. त्यांच्या अनुभवांच्या साहाय्याने केलेली पालकत्वाबद्दलची ३६६ कालातीत चिंतनं ‘द डेली डॅड’ पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. या चिंतनांना बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे यांच्या पालक असण्याच्या स्वानुभवाचाही भक्कम आधार आहे. हे पुस्तक तुम्हाला मौलिक सल्ले देतं, कधी कान टोचतं, कधी पाठीवर शाबासकीची थाप देतं आणि कधी युक्तीच्या चार गोष्टी सांगतं. या पुस्तकामुळे तुमचा पालकत्वाचा प्रवास सुकर होईल, हे निश्चित !

3. द डेली स्टॉइक
शहाणपण चिकाटी आणि जीवन जगण्याची कौशल्ये या विषयांवरील ३६६ चिंतन
पाने:398 । किंमत: ₹400
दैनंदिन जीवनात पडणारे हे सारे प्रश्न हा स्टॉइक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. मानवी अनुभवांच्या प्रयोगशाळेमध्ये दोन शतकांतून अधिक काळ तावून सुलाखून निघालेलं हे तत्त्वज्ञान कालातीत आहे आणि आजच्या आधुनिक युगातही ते आपल्याला दिशादर्शन करतं. त्याचा आधार घेऊन चांगलं जीवन कसं जगावं याबद्दलचं हे पुस्तक – द डेली स्टॉइक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रायन हॉलिडे यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart