शॅटर्ड लॅण्ड्स
₹700 Original price was: ₹700.₹630Current price is: ₹630.
- Book : शॅटर्ड लॅण्ड्स
- Authors :सॅम डॅलरिम्पल
- Translator: : मुकुंद वझे
- Pages: 640
-
Price :
₹700Original price was: ₹700.₹630Current price is: ₹630. - ISBN: 9788199454927
अगदी १९२८पर्यंत, आशियातील एक विशाल प्रदेश ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भुतान, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन आणि कुवेत यांचा समावेश होता – एकाच साम्राज्यशाही सत्तेखाली होता. हा राजकीय भूभाग अधिकृतपणे ‘इंडियन एम्पायर’ (भारतीय साम्राज्य) म्हणून आणि सामान्यतः ‘ब्रिटिश राज’ किंवा केवळ ‘द राज’ या नावाने ओळखला जात असे.
भारतीय साम्राज्य ही ब्रिटिश साम्राज्याची सर्वांत मौल्यवान मालमत्ता मानली जात असे. हा विशाल प्रदेश लाल समुद्रापासून आग्नेय आशियातील जंगलांपर्यंत पसरलेला होता. जगातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या यात वास्तव्यास होती आणि यात हिंदू, मुस्लीम, शीख व पारशी या जगातील सर्वांत मोठ्या समुदायांचा समावेश होता. या साम्राज्यात राहणारे लोक भारतीय रुपयाचा चलन म्हणून वापर करत असत, त्यांच्याकडे ‘इंडियन एम्पायर’ (भारतीय साम्राज्य) असा उल्लेख असलेला पासपोर्ट असे आणि बाब-अल-मंदेब (लाल समुद्र व एडनचे आखात यांना जोडणारी सामुद्रधुनी) ते हिमालयापर्यंत पसरलेल्या किल्ल्यांवर तैनात असलेल्या सैन्याकडून त्यांचे संरक्षण केले जाई.
आणि त्यानंतर अवघ्या पन्नास वर्षांतच भारतीय साम्राज्याचे विघटन झाले. पाच फाळण्यांनी त्याचे स्वतंत्र भागांत विभाजन केले, त्यातून नवीन देश निर्माण झाले, देशांच्या सीमा बदलल्या आणि युद्ध, विस्थापन व फुटीचा एक कायमस्वरूपी वारसा मागे राहिला. सॅम डॅलरिम्पल यांचे हे विचक्षण पुस्तक ऐतिहासिक अभिलेखागारांमधील सखोल संशोधन, यापूर्वी कधीही अनुवादित न झालेली इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, पंजाबी, कोन्याक, अरबी व ब्रह्मी या भाषांमधील खासगी संस्मरणे आणि मुलाखती यांवर आधारित आहे. या पुस्तकात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे आणि मोठ्या प्रमाणात घडून आलेली स्थलांतरे व युद्धे यांत ज्यांची वाताहत झाली, अशा सामान्य लोकांच्या कथांचा समावेश आहे. शॅटर्ड लॅण्ड्स हे एक जिवंत, रंजक आणि विचारप्रवर्तक पुस्तक असून, ते इतिहासाचे अत्यंत प्रभावी चित्रण करते.




Reviews
There are no reviews yet.