स्टीव्ह जॉब्स

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

हे पुस्तक कल्पक नावीन्याविषयीही आहे अशी मला आशा आहे. जेव्हा युनायटेड स्टेट्स त्याच्या नावीन्यपूर्णतेला टिकवायचा प्रयत्न करत आहे, जेव्हा जगभरातील समाज डिजिटल युगातील कल्पक अर्थव्यवस्था उभारायचा प्रयत्न करत आहेत, अशा काळात जॉब्स हा प्रचंड सर्जनशीलता असलेला, कल्पनाशक्ती लाभलेला आणि टिकून राहणारी नावीन्यपूर्णता देऊ शकणारा असा आदर्श मनुष्य ठरतो. एकविसाव्या शतकात जर आपलं मूल्य वाढवायचं असेल, तर सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालायला हवी, हे त्याला बरोबर समजलं होतं. त्यामुळे त्याने अशी कंपनी उभारली, जिथे कल्पनाशक्तीचे वारू उघळतात आणि त्यांना साथ लाभते विलक्षण अशा अभियांत्रिकी कौशल्याची. तो आणि अॅपलमधले त्याचे सहकारी यांनी वेगळा विचार केला केवळ ठरावीक गांसाठी मध्यम दर्जाच्या सुधारणा असलेली उत्पादनं न बनवता, त्यांनी संपूर्णपणे नवी उत्पादनं आणि सेवा निर्माण केल्या, ज्यांची आपल्याला गरज आहे हे खुद्द ग्राहकांनाही त्यापूर्वी माहीत नव्हतं ! तो काही आदर्श बॉस किंवा आदर्श व्यक्ती नव्हता, ज्याचं एक छानसं पॅकेज अनुकरणासाठी देता येईल. स्वतः ‘भयंकर’ विचारांनी पछाडून जाऊन तो आजूबाजूच्या लोकांचं जिणं हराम करायचा, त्यांना संताप किंवा निराशा येईपर्यंत. पण त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या टोकाच्या आवडीनिवडी आणि त्याची उत्पादनं या सगळ्यांचा परस्परसंबंध आहे. अगदी जसं अॅपलचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वेगळं करता येणार नाही, तसंच. या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून ती उत्पादनं बनली आहेत. त्याच्या कहाणीतून आपल्याला मार्गदर्शनही मिळतं आणि सावधगिरीचा इशाराही. या पुस्तकात नावीन्यपूर्णता, व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि मूल्ये यांचे कितीतरी धडे वाचायला मिळतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टीव्ह जॉब्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart