ज्या कलाकृती आपल्याला आवडतात, ज्यांच्याशी आपण रिलेट करू शकतो – त्यांचं एक अनामिक नातं आपल्याशी जोडलं जातं. ते कुठेतरी पूर्वानुभवांमध्ये, आठवणींमध्ये असतं हा एक अत्यंत चपखल मुद्दा या पुस्तकात आहे. मला आवडलेली कितीतरी गाणी, चित्रं, पुस्तकं, चित्रपट इतके का आवडले? याची उत्तरं मला अचानकपणे या मुद्दयातून सापडली.
“त्या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे..” या बोरकरांच्या कवितेप्रमाणे “त्या नदीच्या पार पाहण्याची नजर” हे पुस्तक वाचताना, अनुभवताना हवी. त्यासाठी ऋतूंचे बदलते रंग, पक्ष्याची शीळ, फुलत जाणाऱ्या कळ्यांचं मनोगत, मावळत्या सूर्याचं अंतरंग असं पल्याडचं जाणवणारी संवेदना हवी.
एक नक्की, एकदा वाचून हातावेगळं करण्याचं हे पुस्तक नव्हे. वाचकांना या पुस्तकात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, काही गोष्टी उलगडतील, काही गोष्टी तपासून पाहण्याची इच्छा होईल, काही गोष्टी सुधारायला हव्यात याची जाणीव होईल. तुमच्या आयुष्याबरोबर हे पुस्तक प्रवास करत राहील..!
-नीलांबरी जोशी
Reviews
There are no reviews yet.