ट्रेडिंग हे ८० टक्के मनोरचनेबर आणि २० टक्के वैयक्तिक शिस्तबद्ध पद्धतीवर अवलंबून असतं हे समजून घेणं ही यशस्वी ट्रेडर होण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट आहे. अत्यंत यशस्वी ट्रेडरना हे नक्कीच माहीत असतं. वस्तुनिष्ठ आणि निर्भय मनोरचना ही इक्विटी वक्राचा वाढत चाललेला आकार तसाच राखण्याची गुरूकिल्ली असते, हे त्यांना समजलेलं असतं. म्हणूनच आपली स्वतःची मनोरचना व्यवस्थितपणे समजलेला ट्रेडर आपल्याकडच्या सर्वसामान्य मूलभूत आणि तांत्रिक माहितीच्या जुजबी आधारावरही बाजारात सातत्यानं जिंकत जातो.
‘शेअर बाजार हे एक ‘पर्यावरण’ आहे (फक्त बाताबरण नाही) आणि तिथे आधुनिक सामाजिक जीवनात आणि समाजात इतरत्र आढळणारे नेहमीचे निबंध, दबाव नसतात. म्हणून शेअर बाजारात या बाधांची फिकीर न करता प्रत्येक ट्रेडरला त्याला स्वतःला हवी असलेली फलनिष्पत्ती मिळवण्याचं स्वातंत्र्य असतं. आपल्या लक्षात हे कसं आलं त्याचं डग्लस परीक्षण करतात. शिवाय ते वाचकांनाही ती प्रक्रिया स्पष्ट करून सांगतात.
या पुस्तकातील ठळक मुद्दे :
• नवीन विचारपद्धतीच्या गरजेमागची कारणं
• बाजार नेहमीच बरोबर असतो.
•बाजारात नफ्याच्या आणि तोट्याच्या अमर्याद शक्यता आणि क्षमता असतात.
• बाजाराच्या पर्यावरणात कारणं, समर्थन अप्रस्तुत असतात.
•यशस्वी ट्रेडर होण्याचे तीन टप्पे
• उद्दिष्टपूर्तीमागची प्रेरणाशक्ती
•यशाकडे नेणाऱ्या पायऱ्या.. आणि याशिवाय आणखीही बरंच काही.
Reviews
There are no reviews yet.