द फ्री व्हॉइस

Original price was: ₹250.Current price is: ₹225.

भारतीय समाज आणि राजकारणाची खोलवर समज असलेले, आणि कठोर सत्यनिष्ठा असलेले फार थोडे पत्रकार आज भारतात आहेत. प्रभावीपणे सत्य मांडण्याची हातोटी आणि प्रामाणिकपणाही फार कमी पत्रकारांत आढळतो. यांपैकीच एक महत्त्वाचे पत्रकार म्हणजेच रवीश कुमार होय. या पुस्तकात रवीश कुमार यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निबंधांचा, लेखांचा आणि भाषणांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यात अनेक विषयांचा परामर्श लेखकाने घेतला आहे. तसेच त्यांनी समाजमाध्यमं आणि मुख्य प्रवाहातील माध्यमं यांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवकाश दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, यावरही परखड भाष्य केलं आहे. सध्याच्या भारतात निर्भय अभिव्यक्तीला असलेला धोका वाढत चालला आहे, सेन्सॉरशिपचा विळखा आवळतो आहे, व्यवस्थात्मक, मानसिक आणि शारीर हिंसेची शक्यता वाढत चाललेली आहे; त्यामुळे चर्चा, संवाद, सामाजिक सुसंवाद यांची जागा असहिष्णुता आणि द्वेष घेतील का, अशी साधार भयशंका रवीश कुमार व्यक्त करतात. माध्यमं, लोकप्रतिनिधी आणि देशातील इतर अनेक संस्था मिळून लोकांचा घात करत आहेत, याचीही संगतवार मांडणी ते करतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात सध्या नष्टप्राय होत चाललेली सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख लोकशाही परंपरा पुनःप्रस्थापित करण्यासाठी आपण नागरिक या नात्याने काय करायला हवं, याचंही विवेचन ते करतात. ‘द फ्री व्हॉइस’ हे पुस्तक कधी तिरकस, कधी सडेतोड आणि सातत्याने सखोल गंभीर शैलीत, देशाच्या समकालीन परिस्थितीवर वृत्तांकनासारखीच टिप्पणी करतं. त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं.

Availability: 93 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द फ्री व्हॉइस”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart