विनायक होगाडे 3 बेस्ट सेलर पुस्तकांचा संच
₹900 Original price was: ₹900.₹799Current price is: ₹799.
-
Price :
₹900Original price was: ₹900.₹799Current price is: ₹799.
1.विठोबा मिसिंग इन पंढरपूर
संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित.- प्रवीण दशरथ बांदेकर
किंमत -400
पाने -368
2. डियर तुकोबा
किंमत -250
पाने -169
3. ओह माय गोडसे
ओह माय गोडसे’ ही गांधी आणि गोडसे या दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वावर भाष्य करणारी कादंबरी आहे. निव्वळ भाष्य नव्हे तर त्यांच्यातलं द्वंद्व कथेच्या रुपात उभं करणारी कादंबरी आहे. ‘गांधी कभी मरते नही’ असं आपण नेहमी म्हणतो. पण गांधी मरत नाहीत म्हणून नथुराम संपला, असं समजून कसं चालेल? या दोन्हीही प्रवृत्ती आणि यांच्यातलं द्वंद्व हे चिरंतन आहे, हे सूत्र सांगणारी ही कादंबरी आहे. गांधींभोवती त्यांच्या खुनानंतर जाणीवपूर्वक भलंमोठ गैरसमजाचं जाळं उभं केलं गेलेलं आहे. आणि ही गैरसमजांची जळमटं दूर करण्याचे काम ही कादंबरी नक्की करत असली तरी त्यातून फक्त गांधीच नव्हे तर ‘नथुराम’ ही प्रवृत्तीदेखील आपल्याला उलगडत जाते.
किंमत -250
पाने – 203



Reviews
There are no reviews yet.