जवाहरलाल नेहरू यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं
₹1,898 Original price was: ₹1,898.₹1,518Current price is: ₹1,518.
-
Price :
₹1,898Original price was: ₹1,898.₹1,518Current price is: ₹1,518.
1.शोध भारताचा -जवाहरलाल नेहरू
पाने:586। किंमत: ₹799
अहमदनगरच्या किल्ल्याच्या तुरुंगात ५ महिन्याहून अधिक काळ अटकेत असताना शोध भारताचा या अभिजात ग्रंथाचे लेखन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहातून झाले. या पुस्तकाचे प्रकाशन सर्वप्रथम १९४६ साली झाले होते.
या ग्रंथाचा आवाका अफाट आहे आणि विद्वत्ता विलक्षण आहे. भारताच्या इतिहासातील एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या समृद्ध आणि गुंतागुंतीच्या भूतकाळाचे विहंगमदृश्यच या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे.
2.जवाहरलाल नेहरू आत्मकथा -जवाहरलाल नेहरू
पाने:614। किंमत: ₹799
आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याचे भवितव्य यांच्याशी जवाहरलाल नेहरूंचे जीवन अतिशय जवळून जोडले गेलेले आहे. ही त्यांची आत्मकथा १९३४-३५ या काळात ते तुरुंगात असताना लिहिली गेली. ती एका व्यक्तीच्या वैयक्तिक कहाणीहूनही अधिक आहे. एका देशात घडून आलेली राजकीय जागृती, ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा त्या देशाने दिलेला लढा हे तर यात दिसून येतेच; पण त्याशिवाय ‘आधुनिक समाज’ म्हणून स्वतःला घडवण्याचा आणि त्याच बेळी भूतकाळातील सांस्कृतिक आणि आर्थिक बेड्यांपासून सुटका करून घेण्याचा शोधही दिसून येतो.
3.प्रिय इंदिरा ,वडिलांनी आपल्या मुलीला लिहिलेली पत्र – जवाहरलाल नेहरू
पाने: 165। किंमत: ₹300
एका महान नेत्याने दुसऱ्या महान नेत्याला लिहिलेल्या पत्रांचा मौल्यवान संग्रह इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना पत्र-मालिका लिहिली. त्यामधून पृथ्वी कशी निर्माण झाली, मानवी तसंच प्राण्यांचं जग कसं घडलं, आणि जगभरात सभ्यता-संस्कृती व समाज यांचा विकास कसा होता गेला यांबद्दलची रंजक माहिती रसाळ भाषेत विशद करून सांगितली. १९२८ साली लिहिलेली ही पत्र आजही तितकीच ताजी आणि कालानुरूप वाटतात. त्यामधून नेहरूंचं लोकांबद्दल आणि निसर्गाबद्दल असलेलं प्रेम दिसून येतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर : ‘वाचलेल्या इतर कोणत्याही कथा किंवा कादंबरीपेक्षा ही गोष्ट जास्त रंजक आणि विलक्षण आहे.’






Reviews
There are no reviews yet.