संत साहित्यावरील चार पुस्तकांचा संच

Original price was: ₹1,299.Current price is: ₹1,040.

1.विठोबा मिसिंग इन पंढरपूर
पाने: 368। किंमत: ₹400
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे.
2. डियर तुकोबा
पाने: 169। किंमत: ₹250
तुकारामायण’, ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ आणि ‘डियर तुकोबा’ अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक  जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनचआहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणून होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे.
3. शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया
पाने: 146। किंमत: ₹250
आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे ती आपल्या काळातील ‘अँग्री यंग मॅन’च असलेल्या, दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया’ रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते.
4. होय होय वारकरी
पाने: 400। किंमत: ₹399
वारकऱ्यांनी सर्व नव्या साधनांचा स्वीकार केला तसा नव्या विचारांचा पण स्वीकार करायला हवा, असं मला वाटायचं. समाजधुरिणांनी सतत जुना विचार नवा करायचा असतो. महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बा. र. सुंठणकर, गं. बा. सरदार, वि. भि. कोलते, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, आ. ह. साळुंखे यांनी वारकरी विचाराच्या संदर्भात वेळोवेळी असे नवे आयाम सादर केले. आधुनिक समजल्या जाणाऱ्या विचार व्युहातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे वातावरण वारकरी संप्रदायानेही तयार केलेले होते

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संत साहित्यावरील चार पुस्तकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart