इलॉन मस्क यांच्या यशाचे १०० मंत्र

Original price was: ₹250.Current price is: ₹225.

इलॉन मस्क हे जगप्रसिद्ध व्यावसायिक आणि प्रतिष्ठित उद्योजक असून ते नेहमीच चर्चेत असतात. मग ती चर्चा सकारात्मक असो वा विवादास्पद. समोर उभ्या ठाकलेल्या समस्येविषयी तक्रार न करता, त्यावर आत्मविश्वासाने तोडगा काढण्याचीच त्यांची वृत्ती आहे. अनेक अडचणी येऊनही ते सातत्याने लोकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरले आहेत. अडचणींची गुंतागुंत अतिशय किचकट असूनही समस्येवर उत्तर शोधण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सामान्यतेच्या मर्यादा ओलांडून प्रचंड यश मिळवले आहे. ‘तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा अथवा त्यांचा तिरस्कार करा, पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,’ हा वाक्प्रचार त्यांना तंतोतंत लागू पडतो. त्यांनी तीन वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांत पाऊल ठेवून त्या उद्योगांचा कायापालट केला आहे. इलॉन मस्क कोण आहेत, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते समस्यांचा सामना कसा करतात आणि ते काम कशा रीतीने करतात, त्यांचे यश आणि अपयश यांतून आपल्याला कोणते धडे मिळू शकतात, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देते. इलॉन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे सार यात असून त्यातूनच आपल्याला इलॉन यांच्या यशाचे १०० मंत्र गवसतील. म्हणूनच उद्योग वा व्यवसाय जगतात यशस्वी होऊ पाहणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इलॉन मस्क यांच्या यशाचे १०० मंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart